रेल्वेचे तिकिट हरवल्यास डुप्लिकेट तिकीट कसे मिळवायचे ?

पुणे – भारतीय रेल्वे (Indian Railways) हा प्रवासाचा एक सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे. रेल्वेने प्रवास करताना रेल्वेचे तिकीट सुरक्षित ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे, कारण तिकीट हरवले तर समस्या वाढू शकते. मात्र, रेल्वेचे तिकीट हरवले तरी रेल्वेच्या नियमानुसार डुप्लिकेट तिकीट (Duplicate tickets) काढता येते. तिकीट हरवल्यास रेल्वेचा नियम काय आहे ते जाणून घेऊया?

रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवासादरम्यान किंवा त्यापूर्वी तुमचे ट्रेनचे तिकीट हरवले किंवा चोरीला गेले, तर सर्वप्रथम तुम्ही त्याची तक्रार रेल्वेला द्यावी, जेणेकरून कोणीही तुमच्या तिकिटाचा गैरवापर करू शकणार नाही. तथापि, डुप्लिकेट ट्रेन तिकीट फक्त हरवलेल्या, खराब झालेल्या, पुष्टी झालेल्या किंवा आरएसी तिकिटांसाठी जारी केले जाऊ शकतात आणि रेल्वे नियमांनुसार (Railway rules), प्रवासी त्याच स्थानकावरून आणि त्याच दिवशी प्रवास सुरू करू शकतात.

जर तुमचे तिकीट हरवले असेल तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही. परंतु डुप्लिकेट तिकिटावर अतिरिक्त शुल्क भरल्यानंतर तुम्हाला प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या हरवलेल्या तिकीटाबाबत आरक्षण कार्यालयाला ताबडतोब कळवू शकता. त्यामुळे फसवणुकीच्या घटना टाळता येतील.

जर तुम्ही तुमच्या हरवलेल्या कन्फर्मेड आणि आरएसी तिकिटाची रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्यापूर्वी तक्रार केली, तर डुप्लिकेट तिकीट जारी करण्यासाठी सेकंड आणि स्लीपर क्लाससाठी प्रवाशांकडून 50 रुपये आकारले जातात. याशिवाय इतर वर्गांसाठी प्रत्येक प्रवाशाकडून १०० रुपये शुल्क आकारले जाते.

जर तुम्ही आरक्षण तक्ता तयार केल्यानंतर तक्रार केली तर तुम्हाला तिकिटाच्या 50 टक्के शुल्क आकारले जाते. परंतु हा नियम केवळ कन्फर्म तिकिटावर लागू आहे, आरएसी तिकिटासाठी आरक्षण चार्ट तयार केल्यानंतर कोणतेही डुप्लिकेट तिकीट जारी केले जात नाही.सामान्य तिकिटांसाठी डुप्लिकेट तिकिटे बनवली जात नाहीत. आरक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर तुम्ही तिकीट काउंटरवरून बनवलेले डुप्लिकेट तिकीट मिळवू शकता.