Department Meteorology | येत्या 24 तासात ‘या’ ठिकाणी वीजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलक्या पावसाचा अंदाज

Department Meteorology | नाशिक जिल्ह्यात कडक उन्हाचा तडाखा बसत असतानाच काल मालेगाव, सिन्नरसह चांदवड तालुक्यात सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागात काढणीस आलेला गहू, हरभरा भिजल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे.

धुळे शहर आणि परिसरात काल पावसाच्या सरी पडल्या. उकाड्याने हैराण झालेल्या धुळेकारांना या पावसामुळे काही अंशी गारवा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

राज्यात परभणी इथं काल सर्वाधिक 41 पूर्णांक 6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी वीजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. रात्रीच्या वेळी मात्र उष्मा चांगलाच राहील असे हवामान विभागाने (Department Meteorology) कळवले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल