बारावीचा पेपर चांगला न गेल्याने विद्यार्थिनीने उचलले कठोर पाऊल

Ludhiana Crime News: जुनी माधोपुरी परिसरात राहणाऱ्या सिमती सूद (18) या खासगी शाळेतील विद्यार्थिनीने पेपर चांगला गेला नसल्यामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शाळेतून पेपर दिल्यानंतर विद्यार्थिनी आईला भेटली. तिचा पेपर चांगला गेला नसल्याचेही तिने आईला सांगितले. यानंतर ती खोलीत गेली आणि बराच वेळ बाहेर आली नाही. यामुळे तिची आई खोलीत गेली असता आत मृतदेह लटकलेला होता. पोलीस स्टेशन विभाग-3 ने शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

सिमती सूदचे वडील व्यापारी असून ती एका खाजगी शाळेत 12वी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी अर्थशास्त्राचा पेपर होता. पेपर दिल्यानंतर तिने आईला भेटून आज पेपर चांगला गेला नसल्याचे सांगितले. तिच्या आईने तिला समजावून आत पाठवले. पेपर चांगला नसल्याने व्यथित झालेल्या सिमतीने तिच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

महत्वाच्या बातम्या-

‘हार्दिकने संघ सोडला, पण सूर्या-बुमराह संघाशी एकनिष्ठ राहिले’, MI बाबत डिव्हिलियर्सचे विधान

CID फेम अभिनेत्रीवर कुटुबियांकडूनच अत्याचार, शरीरावरील जखमा दाखवत मागितली मदत

हार्दिकच्या ‘या’ एका अटीमुळे रोहितची कर्णधारपदावरुन हकालपट्टी, विश्वचषकापूर्वीच ठरलं होतं सर्वकाही!