भंडारा जिल्ह्यातील आक्षेपार्ह व्हिडीओची विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांना सखोल चौकशी करण्याच्या सूचना..

Bhandara Viral Video: सांस्कृतिक कलाक्षेत्रामध्ये संगीत व नृत्य हा अविभाज्य घटक आहे. परंतु ज्या प्रकारे याचे व्यापारीकरण होऊन नाचताना स्त्रियांना विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणे आणि मग पैसे उधळले जाणं हा निंदनीय प्रकार आहे. ही केवळ एक घटना नसून तो गंभीर गुन्हा असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी व्यक्त केले.

भंडारा जिल्ह्यातील नाका डोंगरी भागामध्ये आणि त्याचबरोबर मोहाडी तालुक्यातल्या बीड या ठिकाणी १७ नोव्हेंबर रोजी महिलांना नाचत असताना विवस्त्र करणे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर पैसे उधळणे हा प्रकार घडला आहे. तसेच या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत.

यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक दोरजे यांच्याशी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी महिलेला विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणे हा गुन्हा आहे. तसेच रात्रीच्या वेळेला अशा प्रकारे लोकांची गर्दीमध्ये स्त्रियांना विवस्त्र करून त्यांचेवर नोटा उधळल्या जातात. यामुळे त्यांनी अश्लील हावभाव करत नाचावं हा दुष्ट हेतू आहे. यामध्ये राजकीय नेते सुद्धा आहेत. हे अत्यंत निषेधार्थ आणि चिड आणणारी घटना आहे. त्यामुळे यामध्ये कडक कारवाईच्या होणे आवश्यक आहे. या प्रकारच्या नृत्य करणाऱ्या स्त्रियांना नृत्य करताना विवस्त्र करून नाचवता कामा नये. अशा लेखी सूचना त्यांना बंधनकारक करणे आवश्यक आहे. यामध्ये पोलिसांनी एक व्यवस्थित नियमावली तयार करावी.. अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दोरजे यांना केलेल्या आहेत.

ज्यावेळी डान्सबार विरोधी कायदा झाला. त्या कायद्या मध्ये अनेक बंधन घालण्यात आली होती. सामान्य लोकांचा सहभाग ज्या कार्यक्रमात असतो त्यावेळेस अशा पद्धतीने लोकांनी महिलांना मजबूर करून त्यांचं लैंगिक शोषण करणे किंवा त्यासारखं गुन्हे करणं हे अत्यंत चिड आणणारी घटना आहे. तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा सामाजिक भान आणि कायद्याची बुज राखली गेली पाहिजे असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली

सनातन धर्म सगळ्यांना जोडणारा आहे – Devendra Fadnavis