चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

Chandrashekhar Bawankule : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचं सांगत एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळेंचे (Chandrashekhar Bawankule) मकाऊ कॅसिनो(Macau Casino) मधील 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आपल्याकडे आहेत असा दावा देखील त्यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊमधील कॅसिनोमधील एक फोटो संजय राऊत यांनी शेअर केला होता. त्यानंतर भाजपने त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांच्या एक फोटो शेअर केला. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले, पैसे डॉलर्समध्ये उडवले. त्याचे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आपल्याकडे आहेत. हे टाकले तर भाजपला दुकान बंद करावं लागेल.

माझ्यावर किती लोकांनी टीका केली, पण आम्ही त्या पातळीवर जाऊ शकतो पण जात नाही असं सांगत संजय राऊत म्हणाले की, जेवढं खोटं बोलाल तेवढं फसाल. प्रति आरोप नको उत्तर द्या. बावनकुळे त्या ठिकाणी नसतील तर त्यांनी मी तो नव्हेच असं स्पष्ट सांगावं. भाजपकडे देशात ईडी आणि सीबीआय आहे, आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय आहे. बावनकुळेंनी तीन तासांमध्ये साडे तीन कोटी रुपये उधळले, बाकी किती खर्च झाला याचा तपास करावा. आपण एक जबाबदार व्यक्ती आहोत, कुटुंबासोबत आहोत याचं त्यांनी भान ठेवावं.

महत्वाच्या बातम्या-