कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी शस्त्रक्रिया शिबीर

फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे आयोजन

Family Planning: कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया,पुणे शाखेच्या वतीने २४ ते ३० नोव्हेंबर दरम्यान विनामूल्य पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले असून नावनोंदणी करावी ,असे आवाहन असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष अॅड. अवलोकिता माने, व्यवस्थापक प्रवीण सोनवणे यांनी केले आहे.

विनामूल्य नोंदणीसाठी ८८८८३८६८८६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन , २o२, वेस्टर्न कोर्ट, १०८२ / अ ,गणेशखिंड, ( ई स्क्वेअर थिएटरसमोर ) पुणे -१६ येथे हे शिबिर होईल.

नसबंदी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन :

१० मिनिट वेळेची ही शस्त्रक्रिया असून अर्धा तास आराम केला कि दैनंदिन कामे करता येतात. पुरुष नसबंदी केलेल्या व्यक्तीस संस्थेकडून रुपये ५००० व सरकारी अनुदान ११०० तर पुरुष नसबंदी साठी तयार केलेल्या दूत व्यक्तीस संस्थेकडून रुपये १ हजार तर सरकारी अनुदान २०० देण्यात येणार आहे. आधारकार्ड ची प्रत, बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत घेऊन यावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.

पुरुषांचा सहभाग आवश्यक

स्त्रियांच्या कुटुंब नियोजन शस्त्र क्रियेपेक्षा पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया सोपी आहे . लग्न करून घरात येणारी पत्नी घर सांभाळण्यापासून संततीला जन्म देणे ,संगोपन ,घरकामाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असते . म्हणून कुटुंब नियोजनाची जबाबदारीही तिच्यावर टाकण्यापेक्षा पुरुषांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे .

~Dr.Deepak Bidkar,Gauri Bhave-Bidkar,Prabodhan Madhyam(News Agency),Pune 9850583518

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली

सनातन धर्म सगळ्यांना जोडणारा आहे – Devendra Fadnavis