विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

Hemant Rasne– केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नोंदणी करण्या करता दिनांक २८ नोव्हेंबर ते २६ जानेवारी अशा दोन महिन्यांच्या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा (Developed Bharat Sankalp Yatra) होत आहे. या यात्रेचा शुभारंभ आज श्री कसबा गणपती मंदिर येथुन झाला. ही यात्रा पुण्यातील १२५ चौकात जाऊन केंद्र सरकार च्या विविध योजनेची माहिती, नोंदणी येत्या दोन महिन्यात करणार आहे. या यात्रेचा शुभारंभ पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार , सहआयुक्त कुणाल खेमणार, शहराध्यक्ष धीरज घाटे , माजी स्थायी समिती अध्यक्ष व कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, माजी नगरसेवक योगेश समेळ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाला

या वेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) म्हणाले की ‘केंद्र सरकार ने विविध योजना सामान्य नागरिकांच्या साठी जाहीर केल्या त्या नुसत्याच जाहीर न करता प्रत्यक्षात अंमलात आणल्या जातात याचा मनस्वी आनंद होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा असलेला दृष्टीकोन हा उद्याचा उज्वल भारत घडविणारा आहे म्हणूनच भारताची यशस्वी वाटचाल चालू आहे.

आयुक्त विक्रम कुमार यांनी या यात्रेची सविस्तर उद्देश व माहिती दिली यावेळी जास्तीतजास्त नागरिकांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातल्या दूषित वातावरणाला खोके सरकार जबाबदार, खोके सरकारने महाराष्ट्राचे राजकारण दूषित केले – सुळे

कर्णधार सापडला पण हार्दिकसारखा अष्टपैलू कसा सापडणार? या 5 खेळाडूंवर गुजरातची नजर असेल

आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही; सुप्रिया सुळे यांचा दावा