Ramiz Raja : पाकिस्तानला आता सतत हरण्याची सवय झाली आहे; रमीझ राजाने पाकिस्तानी संघाला झापलं

जर भारतीय खेळपट्ट्या अशा असतील तर तुम्हाला 400 धावा कराव्या लागतील

Ramiz Raja On Pakistan Cricket Team: विश्वचषकापूर्वी सराव सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. मात्र, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 5 बाद 345 धावा केल्या. पण न्यूझीलंडने अवघ्या 43.4 षटकात 5 विकेट गमावत 346 धावा करून सामना जिंकला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर सातत्याने टीका होत आहे. आता पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीझ राजाने (Former Pakistan player Rameez Raja) पाकिस्तानच्या पराभवावर संताप व्यक्त केला आहे.

रमीझ राजा म्हणाले की, पाकिस्तान संघाला भारतीय खेळपट्ट्यांशी जुळवून घ्यावे लागेल. मला माहित आहे की हा फक्त सराव सामना होता, पण विजय हा विजय आहे. पण मला वाटते आता पाकिस्तानला सतत हरण्याची सवय झाली आहे. आधी पाकिस्तानी संघ आशिया चषकात पराभूत झाला, आता विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यात पराभूत होत आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंना 4 महिन्यांपासून पगार नाही, खेळाडूंची बोर्डाला धमकी

रमीझ राजाने सांगितले की, पाकिस्तानने निश्चितपणे ३४५ धावा केल्या, पण न्यूझीलंडने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. जर भारतीय खेळपट्ट्या अशा असतील तर तुम्हाला 400 धावा कराव्या लागतील. याशिवाय तुम्हाला तुमच्या रणनीतीत बदल करावे लागतील. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील संघाला जोखीम पत्करावी लागेल, असे मत माजी पाकिस्तानी कर्णधाराने व्यक्त केले.

https://www.youtube.com/watch?v=Uppt2Vwrn_8

महत्वाच्या बातम्या-
रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालात होणार चक्क लावणीचा कार्यक्रम?

बाराही महिने चालणारे व्यवसाय, दर महिन्याला तगडी कमाई करुन देऊ शकतात ‘हे’ व्यवसाय

Bed Bugs: ढेकणांना त्रासलाय? ‘हे’ घरगुती उपाय करुन एका दिवसात पळवून लावा ढेकूण