Devendra Fadnavis | मनोज जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर;पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जातीवरून टीका केली होती. यासोबत त्यांनी फडणवीस यांनी शिवीगाळ देखील केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर थेट उत्तर देणं टाळलं होतं. अखेर आज त्यांनी यावर भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीच्या वार्षिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना मनोज जरांगे यांच्या ‘ब्राम्हणी कावा’ आणि ‘सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न’ या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यावर जरांगे पाटील स्वतःच बोलले आहेत.

ते म्हणाले की, ‘मी खूप दिवस उपाशी होतो त्यामुळे माझा बोलताना ताबा सुटला.’ जरांगे पाटील यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिल्यामुळे त्याकडे लक्ष देत नाही, तुम्हीदेखील (प्रसारमाध्यमं) जरांगे-पाटलांचं वक्तव्य सोडून द्या, त्यांना जाऊ द्या. मनोज जरांगे नवीन आहेत. परंतु, राजकारणातले वरिष्ठ लोकही असं वागतात.

फडणवीस पुढे म्हणाले, शरद पवारांसारखा माणूससुद्धा जातीवर येतो. आम्ही (भाजपाने) कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींना निवडणुकीचं तिकीट दिलं तेव्हा शरद पवार किती नाराज झाले होते. तेव्हा शरद पवारांनी केलेलं वक्तव्य आठवून पाहा. शरद पवार तेव्हा म्हणाले होते की, पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे आणि आता पेशवे छत्रपती नेमायला लागलेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचं मला नवल वाटलं नाही. ते काही नवीन वक्तव्य नाही. एखाद्या व्यक्तीविरोधात बोलायला काही नसेल तेव्हा अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

माझ्याविरुद्ध असा प्रकार होताना मी नेहमीच पाहिलं आहे. जेव्हा त्यांना माझ्याबद्दल बोलायला कुठलाही विषय मिळत नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचे किंवा राजकीय आरोप करता येत नाहीत, अकार्यक्षमतेचे आरोप करता येत नाहीत, तेव्हा जातीवरून आरोप लावण्याचे प्रयत्न केले जातात.असे फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’