Sunetra Pawar | सुनेत्रा पवार यांची तिरकी चाल;काँग्रेसच्या माजी मंत्र्याची घेतली भेट

Sunetra Pawar – कोणत्याही परिस्थितीत बारामतीत विजय मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने निर्धार केला आहे. यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मैदानात उतरणार असल्याची चर्चा असून त्यांनी गाठीभेटी घेण्याचा धडाका लावला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी या दौऱ्यादरम्यान आज काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांची राहत्या घरी जात भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे (Anantrao Thope) यांची भेट घेतली तेव्हा संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरुपा थोपटे आणि पुत्र पृथ्वीराज थोपटे हे देखील उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

दरम्यान, या भेटीवेळी सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. थोपटे कुटुंबीय आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतांचं गणित जुळवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी थोपटे कुटुंबियांची भेट घेतली तर नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’