देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, ट्विट करून केलं ‘हे’ आवाहन

मुंबई – माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. सध्या ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार करत असून, माझ्या जे कोणी संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते. आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आपल्या सर्व राजकीय कार्यक्रम रद्द (Cancel all political events) केले आहेत.