राहुल गांधींचे मूळ आडनाव हे ‘खान’, हे खरचं गांधी आहे का? – शरद पोंक्षे

मालेगाव : एक तर तू गांधी नाही अन् सावरकर पण नाही… हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहे… महात्मा गांधीचे (Mahatma Gandhi) वंशज नाही तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला, फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याचा यांचा इतिहास असल्याचे सांगत राहुल गांधी (Rahul Gandhi) हे खरंच गांधी आहेत का? त्यांचे मूळ नाव ‘खान’ असल्याची टिका अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केली.

मालेगाव शहरात भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृतीसाठी वीर सावरकरांच्या जीवनावरील व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टिका केली. राफेल प्रकरणात सुद्धा त्यांनी सुप्रिम कोर्टात माफी मागितली. जोपर्यंत अपिल करण्याची संधी आहे, तोपर्यंत हे कोर्टात माफी मागत असतात. सावरकर प्रकरणात हेच झाले, असेही पोंक्षे म्हणाले.

शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) म्हणाले की, ‘एक तर तू गांधी नाही अन् सावरकर (Veer Sawarkar) पण नाही… हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहेत… महात्मा गांधीचे वंशज नाही, तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला, फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याचा यांचा इतिहास असल्याचा आरोप शरद पोंक्षे यांनी केला. या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही तर यांना सावरकरांचा कसा माहित असणार?’ अशी टिका शरद पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानात केली.