LokSabha Election 2024 | नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धवट काँग्रेसमध्ये विकासाची ताकद नाही!

LokSabha Election 2024 | एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि दोघांनी मिळून अर्धी केलेली उरलीसुरली काँग्रेस यांची तीनचाकी ऑटोरिक्षा महाराष्ट्राचा विकास करू शकणार नाही, इंजिन एकाचे, चाके एकाची, आणि सुटे भाग तिसऱ्याचे अशी ही रिक्षा निवडणुकीच्या निकालानंतर आणखीनच मोडीत निघणार असून एकमेकांशी संघर्ष करणार आहे, तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी देशाला विकास आणि समृद्धीच्या दिशेने नेणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर बसविण्याचा निर्धार करा, असे आवाहन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज नांदेड येथे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराचा जोरदार प्रारंभ केला.

आगामी लोकसभा निवडणूक (LokSabha Election 2024) ही केवळ प्रतापराव पाटील यांना विजयी करण्याची निवडणूक नाही, तर समृद्ध भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविणारी निवडणूक आहे. मोदी यांनी दहा वर्षांत देश समृद्ध केला. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारच्या काळात अकराव्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर बसल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणणार, ही मोदी यांची गॅरंटी आहे, असेही अमित शाह म्हणाले.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, आणि देशाचा प्रत्येक नागरिक काश्मीर करिता संघर्ष करण्यासाठी सज्ज आहे. गेली 70 वर्षे कलम 370 ला अनौरस पुत्राप्रमाणे कवटाळून बसलेल्या काँग्रेसला मात्र, हे कलम रद्द झाल्यावर पोटदुखी सुरू झाली. कलम 370 रद्द होणे गरजेचे होते, आणि नरेंद्र मोदी यांनी ते काम करून काश्मीरला खऱ्या अर्थाने देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले. भारताची सेना आणि देशाची सीमा यांच्याबाबत छेडखानी करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल असा संदेश मोदींनी पाकिस्तानला आणि जगाला दिला आहे. नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले, असेही श्री.शाह यांनी नमूद केले. काँग्रेसने राम मंदिरात अडथळे आणले, तर मोदी यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण केले. पाचशे वर्षांनंतर प्रथमच रामनवमीला प्रभू श्रीराम आपला वाढदिवस भव्य मंदिरात साजरा करणार आहे. काँग्रेसला वोटबँकेची भीती आहे, म्हणून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या निमंत्रणाकडेही त्यांनी पाठ फिरविली, जे या सोहळ्यास उपस्थित राहू इच्छित होते, त्यांनाही पक्षातून काढून टाकले. काँग्रेसने देशाच्या संस्कृतीचा अपमान केला, तर देशाच्या अस्मितांना सन्मान देण्याचे काम मोदींनी केले, असे ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत