‘त्या’ पत्राचं काय करायचं ते मी करीन, भूमिका पाहीन; नवाब मलिकांचा विषय निघताच अजितदादांची चिडचिड!

Ajit Pawar Role About Nawab Malik: महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत (Mahayuti) घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार आता कोणती भूमिका घेणार? याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली होती. आज (8 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा दुसरा दिवस आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या अनुषंगाने पाठवलेल्या पत्रावर कोणती भूमिका आहे? अशी विचारणा केली असता अजित पवारांची चांगली चिडचिड झाल्याचे दिसून आले.

त्या पत्राचं काय करायचे ते मी करीन, मी तुम्हाला (मीडिया) सांगून करणार नाही, प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. नवाब मलिक यांच्याशी बोलून त्यांची भूमिका काय आहे हे पाहिल्यानंतरच मी माझा निर्णय आणि पक्षाची भूमिका जाहीर करीन. त्याचबरोबर त्यांनी मी पत्र वाचलं आहे, असे त्यांनी सांगितलं. कोण कुठं बसलं हे टीव्हीवाल्यांनी दाखवून दिलं असेही ते म्हणाले.

त्यामुळे एकंदरीत नवाब मलिक यांची बाजू सांभाळून घेताना अजित पवार यांची चांगलीच चिडचिड झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवल्यानंतर त्यांना या संदर्भात विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी या प्रश्नावर मौन बाळगणे पसंत केले. त्यामुळे आजच्या विधानसभेच्या कामकाजामध्ये नवाब मलिक नेमके कोठे बसणार? सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर विरोधक कोणती भूमिका घेणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम