राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक पहिलीत का ?  सोशल मीडियात फोटो व्हायरल

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या परिवारासाठी नुकतीच आनंदाची बातमी समोर आली आहे. राज ठाकरे (Raj Thackrey)यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackrey)आणि सून मिताली ठाकरे (Mitali Thackrey) यांना पुत्ररत्नाचा (Amit Thackeray son)  लाभ झाला आहे.

दरम्यान, आता अमित ठाकरेंनी रविवारी त्यांच्या बाळाचा फोटो फेसबुकवरुन (Facebook) शेअर केला आहे. त्यामध्ये, चिमुकल्याच्या करंगळीत आपल्या हाताचे बोट दिले आहे. त्यात, राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक पाहायला मिळत आहे.  सध्या हा फोटो व्हायरलही झाला आहे. फोटोसोबत केवळ हार्टचे इमोजी शेअर करण्यात आले आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत असून ठाकरे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.