विरोधकांच्या ऐक्याला केजरीवाल सुरुंग लावण्याच्या तयारीत ? कॉंग्रेस-आप मध्ये मतभेद वाढले

Lok Sabha Election 2024: 23 जून रोजी बिहारच्या पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली होती . यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Congress President Mallikarjun Kharge, Former President Rahul Gandhi, West Bengal Chief Minister Mamata Banerjee and Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांच्यासह अनेक नेते पोहोचले होते.

दरम्यान, केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने (आप) बुधवारी (२८ जून) सांगितले की ते दिल्लीतील सर्व सात लोकसभा जागांवर एकटेच लढणार आहेत. ‘आप’चे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले की, निवडणूक प्रचारादरम्यान केंद्राचा अध्यादेश तुमच्या विरोधात असल्याचे आम्ही जनतेसमोर सांगू. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आप नेते संदीप पाठक यांनी दिल्ली आणि हरियाणाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, भाजपच्या विरोधात विरोधी एकजुटीची गरज आहे, परंतु ते काँग्रेसच्या वृत्तीवर अवलंबून आहे.

खरेतर, पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर ‘आप’ने एक निवेदन जारी केले होते की, जर काँग्रेसने दिल्ली अध्यादेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर आम्ही कोणत्याही बैठकीत सहभागी होणार नाही, ज्यामध्ये काँग्रेसचा भाग असेल. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या बैठकीनंतर विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पुढील रणनीतीबाबत विरोधी पक्ष 10 ते 12 जुलै दरम्यान शिमला, हिमाचल प्रदेश येथे एक दिवसीय बैठक घेणार आहेत. यावर आप नेते पाठक म्हणाले की, बैठकीला उपस्थित राहायचे की नाही याचा निर्णय आपचे संयोजक अरविंद केजरीवाल घेतील.