सध्याच्या आव्हानात्मक काळात भारताच्या अर्थव्यवस्थेकडे आशेचा किरण म्हणून पाहिले जात – नरेंद्र मोदी

PM Narendra Modi – सध्याच्या आव्हानात्मक काळात भारताच्या अर्थव्यवस्थेकडे आशेचा किरण म्हणून पाहिले जात असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले. अर्थव्यवस्थेसंदर्भातील एका अहवालाचे प्रकाशन करताना मोदी बोलत होते.

अर्थव्यवस्थेत होणारी भक्कम वृद्धी आणि लवचिकता असल्यानं देशाचं भविष्य आशादायक आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीची ही गती कायम ठेवण्याची आणि 140 कोटी भारतियांची समृद्धी सुनिश्चित करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले.भारतानं मेक इन इंडिया सारख्या योजनांसह आपली उत्पादन मूल्य साखळी अबाधित ठेवण्याचे उद्दीष्ट ठेवलं असून, उत्पादन क्षेत्र 2025 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची आशा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा हवाला देत अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारताची अर्थव्यवस्था 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि 2027 पर्यंत भारत जपान, जर्मनी या दोन्ही देशांना मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल असेही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

अर्थ मंत्रालयाच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराची सुरुवात
अर्थ मंत्रालयाच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराची सुरुवात गुजरात मधील केवडिया इथल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ इथं आज होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या या शिबिराला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला अर्थ मंत्रालयाच्या विविध विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या आराखड्यासह विविध मुद्द्यांवर या शिबिरात चर्चा होणार आहे.