आईच्या मृत्यूनंतर राखी सावंतने फोडला टाहो; ‘सलमान भाई माझी आई गेली’, म्हणत ढसाढसा रडली

Rakhi Sawant mother Died: राखी सावंतची आई जया यांचे निधन झाले आहे. त्या बर्‍याच दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ब्रेन ट्यूमरवर उपचार सुरू होते. स्वतः राखी सावंतने तिच्या आईच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राखी सावंतने सांगितले की तिची आई जया यांचे निधन झाले आहे. आईचे मल्टिपल ऑर्गन निकामी झाले होते आणि तिची प्रकृती चिंताजनक होती. कर्करोग किडनी आणि फुफ्फुसात पसरला होता. परिणामी अखेर काल त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. आईच्या मृत्यूनंतर राखीवर दु:खाचा डोंगर कोसळला. आईचे पार्थिव रुग्णालयाबाहेर नेताना राखी ढसाढसा रडताना दिसली. या भावनिक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हिडिओत दिसते की, राखी तिच्या आईचा मृतदेह हॉस्पिटलबाहेर घेऊन जात आहे. यादरम्यान तिचे डोळे पूर्णपणे सुजलेले दिसत आहेत. अश्रूंचा टाहो फोडताना राखी सलमान खानचेही नाव घेताना दिसत आहे. भाई, माझी आई मेली भाई.. सलमान भाई माझी आई मला सोडनू गेली.. असे म्हणत राखीला अश्रू अनावर होताना दिसत आहेत. तसेच या भावनिक प्रसंगी राखी तिचा पती आदिल दुर्रानीची आठवण काढताना दिसते आहे.

https://www.instagram.com/reel/Cn-CrQDAzo3/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान राखी सावंतने जानेवारीत चाहत्यांना सांगितले होते की, कर्करोगानंतर तिची आई जया यांना ब्रेन ट्युमरही झाला होता. यासोबतच राखीने चाहत्यांना आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. 2021 मध्ये राखीच्या आईचे कर्करोगाचे ऑपरेशन झाले होते, त्याबद्दल तिने सलमान खान आणि सोहेल खान यांचे आभार मानले होते. राखीच्या आईच्या उपचाराचा खर्च दोन्ही भावांनी उचलला होता.