असे कपडे घालून गंगा आरतीला पोहोचलेल्या दिशावर भडकले लोक; म्हणाले, हिला कोणीतरी योग्य दिशा दाखवा

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सध्या ‘शिव की नगरी’ बनारसमध्ये आहे. तिचा एक व्हिडिओ आणि काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती दशाश्वमेध घाटावर गंगा आरती (Ganga Aarti) करताना दिसत आहे. तिने काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी तिने क्रॉप टॉप घातला आणि त्यावर शाल ओढली होती, ज्यामुळे तिला टिकेचा सामना करावा लागत आहे.

या व्हिडिओमध्ये दिशा पटानी बनारसमधील दशाश्वमेध घाटावर गंगा आरती करताना दिसत आहे. यावेळी तिने ट्राउझर्स आणि शालसोबत काळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. या ड्रेसमध्ये तिचे पोट स्पष्ट दिसत होते. ती काही पंडित आणि भक्तांमध्ये दिसते. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर दिशाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

‘पू बनी पार्वती’ असं एकाने लिहिलंय. तर ‘इथेही तिने क्रॉप टॉप घातलाय का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘दिशाला कोणीतरी योग्य दिशा दाखवा’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यातही तोकडे कपडे घातल्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. त्या ड्रेसमुळे दिशाला बऱ्याच टीकांचा सामना करावा लागला होता.