जनतेच्या मनातील मुख्यमंत्री… अजित पवार यांचे पुण्यात बॅनर; पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

Pune – विरोधीपक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी काल एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. त्यानंतर संध्याकाळी अचानक कोथरूडमध्ये अजितदादांचे काही बॅनर्स लागले. अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यात झळकले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

पुण्यातील कोथरूडमध्ये हे बॅनर्स झळकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं या बॅनर्सवर लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… असंही बॅनर्सवर लिहिलं आहे. या बॅनर्सवर अजितदादा पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले आहेत.