Mia Khalifa : इस्रायल-हमास युद्धात पॅलेस्टाईनला पाठिंबा देणे मिया खलिफाला महागात पडले, नोकरी गेली 

Israel-Palestine Conflict:  –  अवघ्या जगाचे लक्ष सध्या इस्राईल – पॅलेस्टाईन संघर्षाकडे लागले आहे. इस्राईलवरील हमासने केलेय दहशतवादी हल्ल्यानंतर युद्धाला प्रारंभ झालां आहे. यातच  अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि इटलीनं काल संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून इस्राईलला पाठिंबा दिला आहे. हमास या दहशतवादी संघटनेनं इस्राईलवर केलेल्या हल्ल्याचा या देशांनी तीव्र निषेध केला आहे. इस्राईलमध्ये आपल्या नऊ नागरिकांचा मृत्यू झाल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. ब्रिटनचे दहा आणि नेपाळचेही दहा नागरिक इस्राईलमध्ये मारले गेले आहेत. ऑस्ट्रिया आणि जर्मनीनं पॅलेस्टाईनला मदत स्थगित केल्याचं जाहीर केलं आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता अॅडल्ट स्टार मिया खलिफाने (Adult star Mia Khalifa) मायक्रोब्लॉगिंग साइट X वर पॅलेस्टाईनचे समर्थन करणारे वक्तव्य जारी केले आहे. ती म्हणाली, जर तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थितीकडे पाहू शकत असाल आणि पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल तर तुम्ही चुकीच्या बाजूने आहात असं ती म्हणाली आहे.

दरम्यान, रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांनी इस्रायल विरुद्ध हमासवरील तिच्या या पोस्टवर नाराजी दर्शवली आहे. यानंतर त्यांनी सोशल मीडियावरच मिया खलिफाला नोकरीतून काढून टाकल्याची घोषणा केली. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली पण मियाने आता तिची नोकरी गमावली आहे.टॉड शापिरोची कंपनी अमेरिका आणि युरोपमध्ये मशरूम होम ग्रोथ किटचे उत्पादन आणि विक्री करते. या वर्षाच्या सुरुवातीला, त्याने मिया खलिफाला कंपनीत आणले, जिथे ती कंपनीचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणार होती.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया