Bacchu Kadu | ‘जास्त उडउड करू नको, तुझाही केजरीवाल करू’, बच्चू कडूंना धमकी

Bacchu Kadu | अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाने नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिल्याने प्रहार संघटनेचे बच्चू कडू नाराज आहेत. त्यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून सातत्याने ते त्यांच्यावर टीका करत आहेत. अमरावतीतून नवनीत राणांविरोधात उमेदवार उतरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. असे असताना आता बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा केजरीवाल करू अशी धमकीवजा चिठ्ठी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

“जास्त उडउड करू नको, तुलाही केजरीवाल सारखं जेलमध्ये टाकेल, नाही तर उडवून टाकेल’ अशी चिठ्ठी सापडली आहे. यावरुन स्पष्टपणे समजते की, बच्चू कडू यांना उघडपणे धमकी देण्यात आली आहे. न्यूज १८ लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

काल नेहरू मैदानात अज्ञात इसमा कडून गर्दीत ही चिठ्ठी मिळाली आहे. या चिठ्ठीमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही चिठ्ठी कुणी आणि का लिहिली याबद्दल अजून माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मैदानातील सीसीटीव्ही फुटेजः च्या आधारे तपास सुरू आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत