Bhasker Jadhav | मुख्यमंत्र्यांवर भाजपचा दबाव, स्वत: च्या मुलाचीही उमेदवारी जाहीर करु शकत नाहीत; भास्कर जाधवांचा टोला

Bhasker Jadhav On Eknath Shinde | लोकसभा निवडणूक 2024साठी भाजपाने महाराष्ट्रातून आतापर्यंत 25 मतदारसंघांसाठी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाचा प्रचंड दबाव असून त्यांना आपल्या बऱ्याच विद्यमान खासदारांचे तिकीट कापावे लागले आहे. तसेच जाहीर केलेले काही उमेदवारही मागे घ्यावे लागले आहेत. दुर्दैव असे की, त्यांना मुलगा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)यालाही उमेदवारी देता आलेली नाही. यावरुन शिवसेना उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

भास्कर जाधव (Bhasker Jadhav) म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच्या मुलाची उमेदवारी देखील जाहीर करू शकत नाहीत. भाजपचा मुख्यमंत्री शिंदेंवर प्रचंड दबाव आहे. एकनाथ शिंदे यांना 13 जागा मिळवणे शक्य नाही, विधानसभेत त्यांची परिस्थिती आणखी वाईट होईल. यवतमाळ, रामटेक, मावळची जागा शिंदेंना सोडव्या लागल्या. भाजपने 25 जागा जाहीर केल्या, मात्र शिंदेंना मुलाची उमेदवारी जाहीर करणे अवघड झाले आहे.” असे भास्कर जाधव म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत