Sanjay Nirupam | देशात सोन्याच्या किंमती, मुलींचे वय आणि मोदींची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे

Sanjay Nirupam | मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. त्यानंतर संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर पत्रकार परिषद घेत संजय निरुपम यांनी काँग्रेसची पोलखोल केली. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेले एक विधान चर्चेचा विषय बनले आहे.

तुम्ही नरेंद्र मोदींसोबत जाणार आहात का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना संजय निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, “मी परवाच म्हणालोय, देशात सोन्याच्या किंमती, मुलींचे वय आणि पंतप्रधान मोदींची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. आता यापेक्षा वेगळं मी काय सांगू,” असे मिश्किल वक्तव्य संजय निरुपम यांनी यावेळी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत