वडिलांच्या आजारावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते – नितेश राणे

Mumbai – अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होत आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून या निवडणुकीत झुंजार नेते मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्व. आ. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत असून आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सेनेला लक्ष्य केले आहे.

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. त्यांना स्वत:चा पक्ष वाचवता आला नाही, चिन्ह वाचवता आलं नाही. वडिलांच्या आजारावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. एकदा प्रवासादरम्यान स्वत: रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास सुरू आहे हे सांगितलं. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान या सर्व गोष्टी बाहेर निघाल्यानंतर सहानुभूती कोणाला मिळते ते पाहू असंही नितेश राणे यांनी यावेळी म्हटलं आहे.