डाएटिंग-व्यायामापेक्षा जास्त फायदेशीर आहे ऋषींचा ‘हा’ वजन कमी करण्याचा उपाय, चरबी होईल गायब

आयुर्वेद (Ayurved) ही एक वैद्यकीय पद्धत आहे, ज्यामध्ये प्रत्येक रोग मुळापासून नष्ट करण्याचा उपाय सांगितला आहे. अनेक महान ऋषींनी आणि आचार्यांनी आयुर्वेद तयार करण्यात योगदान दिले आहे. पोट सुटणे हा एक आजार आहे, जो चरबी वाढल्यावर होतो. ते कमी करण्यासाठी शरीरातील दोष दूर केले पाहिजेत.

फक्त डाएटिंग किंवा व्यायामामुळेच आपण सडपातळ होऊ शकतो, असं लोकांना वाटतं. पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या आहारात फॅट-बर्निंग पदार्थ आणि औषधी वनस्पतींचा समावेश करत नाही, तोपर्यंत वजन लवकर कमी होणार नाही. पोटावरील चरबीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही हे भारतीय मसाले आणि औषधी वनस्पती वापरू (Indian Species And Herbs) शकता.

हळद
हळद हा पिवळा मसाला आहे, जो खाल्ल्यास चरबी कमी होते. त्यात कर्क्यूमिन असते, ज्यामुळे चरबीच्या ऊतींचे इंफ्लामेशन कमी होते. अभ्यासानुसार (संदर्भ) यामुळे तुमचे हात, पाय आणि पोट स्लिम होते. जे लोक काहीही न खाताही जाड होतात त्यांच्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे.

काळे मिरी
आयुर्वेदानुसार लाल मिरचीऐवजी काळी मिरी वापरावी. हे खोकला आणि सर्दी प्रतिबंधित करते आणि चयापचय गतिमान करते. यामुळे तुमची चरबी झपाट्याने कमी होऊ लागते.

अश्वगंधा
या औषधीमुळे मन शांत होते. याचे सेवन केल्याने तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचा विकास थांबतो. जे वाढत्या लठ्ठपणाचे एक प्रमुख कारण आहे. हे इन्सुलिन हार्मोनचे संतुलन देखील करते.

अदरक
तुमच्या आहारातून अदरक कधीही काढून टाकू नये. हे पचन वाढवण्यासाठी आणि सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जाते. हे खाल्ल्याने अनावश्यक भूक लागत नाही आणि तुम्ही सहज वजन नियंत्रित करू शकता.

दालचिनी पावडर
ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे आणि पोटही सुटलेले आहे. या दोन्ही आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दालचिनी खावी. यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करून चरबी कमी करण्याचे गुणधर्म आहेत. हा मसाला तुमच्या हृदयासाठीही चांगला आहे.

(सूचना- हा लेख सामान्य माहितीसाठी असून त्याचा अवलंब करण्यापूर्वी वैद्यकिय किंवा संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.)