ED चा धडाका सुरूच; मंत्री अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड

मुंबई – शिवसेना नेते अनिल परब (Shiv Sena leader Anil Parab) यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ED ) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case)  ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे.

ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत पुणे आणि रत्नागिरीमधील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली जात आहे.