‘माझी किडनी परत कर, नाहीतर 12 कोटी दे’, घटस्फोटानंतर नवऱ्याने बायकोकडे केली विचित्र मागणी

husband Demanded For Kidney To Wife: पती-पत्नीच्या नात्यात दोन गोष्टींची सर्वाधिक गरज असते आणि ती म्हणजे प्रेम आणि विश्वास. या दोन गोष्टी नसतील तर नाते टिकू शकत नाही. लहानसहान गैरसमजांमुळेही नातं तुटतं हे तुम्ही पाहिलं असेल, पण जर नात्यात विश्वास असेल तर गैरसमजांना वाव राहत नाही आणि अशा स्थितीत नातं सुरळीत चालतं. अशातच आता असे एक प्रकरण चर्चेत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

वास्तविक, प्रकरण असे आहे की, एका व्यक्तीने आपल्या पत्नीला दिलेली किडनी परत कर अन्यथा 12 कोटी रुपये भरपाई दे, असे सांगितले आहे. डॉक्टर रिचर्ड बॅटिस्टा ( Dr. Richard Battista) असे या व्यक्तीचे नाव आहे. युनिलाड नावाच्या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, डॉ. रिचर्ड यांनी 1990 मध्ये डोनेल नावाच्या महिलेशी लग्न केले आणि त्यानंतर त्यांना तीन मुलेही झाली. मात्र, नंतर त्यांच्या पत्नीची किडनी खराब झाली, त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant) हा एकमेव मार्ग होता.

डॉ. रिचर्ड यांनी सांगितले की त्यांच्या पत्नीच्या दोन अयशस्वी किडनी प्रत्यारोपणानंतर त्यांनी 2001 मध्ये ठरवले की ते त्यांच्या पत्नीचे आयुष्य आणि त्यांचे लग्न दोन्ही वाचवण्यासाठी त्यांची एक किडनी दान करतील. पत्नीचा जीव वाचवणे हे त्यांचे पहिले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रिचर्ड यांनी त्यांची किडनी दान केल्यानंतर त्यांच्या पत्नीचे प्राण वाचले, पण त्यातून त्यांना योग्य परिणाम न मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डॉ. रिचर्ड यांनी नंतर आपल्या पत्नीवर दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आणि 2005 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

नुकसानभरपाईपोटी 12 कोटींहून अधिक रुपयांची मागणी करण्यात आली होती
रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर डॉ. रिचर्ड यांनी त्यांची पत्नी डोनेलने एकतर त्यांची किडनी परत करावी किंवा त्यांना 1.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 12 कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. मात्र, नंतर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील नासाऊ काउंटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत किडनी ही भेट असल्याचा निर्णय दिला होता.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल