चमत्कार अखेर घडलाच; महाविकास आघाडीची २० मते फुटली आणि प्रसाद लाड विजयी झाले

मुंबई – अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल (Legislative Council Election Results) समोर आला असून भाजपने (BJP) आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला असून महाविकास आघाडीसाठी (MVA) हा मोठा धक्का मानला जात आहे.या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार  चंद्रकांत हंडोरे यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा दिला आहे. कॉंग्रेससह महाविकास आघाडीने पूर्ण ताकत लावून सुद्धा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अचूक नियोजनामुळे  हंडोरे यांना विजय मिळवता आला नाही. भाजपच्या प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मिळवलेला विजय भाजपसाठी आत्मविश्वास वाढवणारा तर महाविकास आघाडीसाठी आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडणारा आहे.

महाविकास आघाडीची तब्बल २० मत फोडत भाजपचे पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाडही विजयी झाले आहेत. लाड यांना पहिल्या फेरीत १७ मत मिळाली. तर दुसऱ्या फेरीत भाजपच्या पहिल्या फेरीतील १२ मत लाड यांना ट्रान्सफर झाल्याने लाड दुसऱ्या फेरीत विजयी झाले आहेत. दरम्यान,  राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर (NCP candidates Eknath Khadse and Ramraje Nimbalkar), भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, प्रवीन दरेकर,प्रसाद लाड आणि श्रीकांत भारतीय (BJP’s Ram Shinde, Uma Khapre, Praveen Darekar, Prasad Lad and Shrikant Bharatiya) यांचा विजय झाला आहे. शिवसेनेकडून आमशा पाडवी, सचिन अहिर (Shiv Sena Amsha Padvi, Sachin Ahir) यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे भाई जगताप देखील विजयी झाले आहेत.