अर्का आणि ग्लोबल टॅलेंट ट्रॅक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ डिजिटल गव्हर्नन्सची स्थापना

पुणे- अर्का आणि ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या दोन उद्योग-अग्रगण्य संस्थांनी एकत्रितपणे इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ डिजिटल गव्हर्नन्स (IADG) हा डिजिटल व वैयक्तिक डेटा संरक्षण निगडित उपक्रम सुरू करण्यासाठी करार केला आहे. या दोन्ही संस्थांनी एकत्रितपणे डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा संदर्भातील एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ डिजिटल गव्हर्नन्स (IADG) ह्या उपक्रमाची सुरवात करण्यात आली.
डिजिटल गव्हर्नन्सच्या क्षेत्रामध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि प्रशिक्षणाची कमी दूर करण्यासाठी आणि विशेषत: डेटा गोपनीयता, एआय गव्हर्नन्स इत्यादि साठी IADG ची स्थापना करण्यात अली आहे.

भारतात नुकताच डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा लागू झाला आहे. जगभरातील इतर १३७ देशांमध्ये आधीच हा कायदा आहे. या कायदयासंदर्भात जागृती करण्यासाठी सामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना तसेच अभ्यासकांना व कोणत्याही शासकीय, निमशासकीय संस्थेतील कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

IADG लाँच करताना, अर्काचे सह-संस्थापक आणि CEO शिवांगी नाडकर्णी म्हणाल्या , ‘जग अधिकाधिक डिजिटल होत असतानाही संबंधित जोखमींना तोंड देण्यासाठी संघर्ष करत असताना ग्लोबल टॅलेंट ट्रॅक सोबत भागीदारी करताना आणि IADG ची स्थापना करताना आम्हाला आनंद होत आहे. संस्था आणि समाजातील नागरिकांना संवेदनशील आणि सुसज्ज करणे हा या प्रयत्नातील एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. यासाठी योगदान देण्यासाठी IADG प्रयत्नशील राहील’

यावेळी ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या सीईओ पल्लवी पाटगावकर म्हणाल्या, ‘डिजिटल युगात व्यक्ती आणि व्यावसायिक दोघांसाठी डेटा गोपनीयता कौशल्ये महत्त्वपूर्ण आहेत. प्रशिक्षणासाठी अर्का सोबतच्या भागीदारीचे उद्दिष्ट संस्थेच्या प्रत्येक स्तरावर डेटा गोपनीयतेसाठी आवश्यक प्रतिभा पूर्ण करणे आहे. एक अग्रगण्य कौशल्य प्रशिक्षण केंद्र म्हणून, ग्लोबल टॅलेंट ट्रॅक ने संस्था आणि सामान्य नागरिक यांना डिजिटल प्रायव्हसीचे प्रशिक्षण देण्याची योजिले आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठो पुढील सांकेतिक स्थळावर तुम्ही भेट देऊ शकता आणि नोंदणी करू शकता – www.iadg.gttconnect.com