गोव्यातून विनापरवाना एक बाटली दारु आणली तरी थेट मोक्का लावणार – शंभूराज देसाई

मुंबई – गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यातच आता गोव्यातून विनापरवाना एक बाटली दारु आणली तरी थेट मोक्का लावणार, असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिला आहे.

एकच व्यक्ती तीन वेळा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सापडल्यास मोक्का लावणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (Kolhapur and Sindhudurg) जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

देसाई म्हणाले की, मी यासंदर्भात आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर मोक्का लावता येईल का हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावला जाईल, असं देसाई म्हणाले.