एकेकाळी ३५ रुपयांची नोकरी करणाऱ्या रोहित शेट्टीने आज उभारलंय मोठं साम्राज्य, संपत्ती तर इतकी की…

नवी दिल्ली| रोहित शेट्टी (Rohit Shetty) आज बॉलिवूडचा अॅक्शन डायरेक्टर म्हणून ओळखला जातो. ‘सूर्यवंशी’, ‘सिंघम’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘सिम्बा’ यांसारख्या अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपटांचा दिग्दर्शक रोहित शेट्टी आज 49 वा वाढदिवस (Rohit Shetty Birthday) साजरा करत आहे. आज रोहित शेट्टीचे नाव जरी बॉलिवूडमध्ये गाजत असले तरी एक काळ असा होता की हा दिग्दर्शक दोन वेळच्या जेवणासाठीही तरसत असायचा. चला तर मग आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शकाच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया-

रोहित शेट्टी चित्रपटांच्या दुनियेत बाहेरचा माणूस नव्हता. रोहितची आई रत्ना शेट्टी आणि वडील एमबी शेट्टी हे फिल्मी दुनियेशी संबंधित होते. त्याची आई बॉलीवूडमधील कनिष्ठ कलाकार होती आणि वडील अॅक्शन कोरिओग्राफर आणि स्टंटमॅन होते. रोहितच्या वडिलांनी अनेक हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. पण अगदी लहान वयात रोहित शेट्टीने वडिलांरुपी आधारस्तंभ गमावला.

वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती, त्यामुळे रोहित शेट्टीला लहान वयातच जबाबदारीचा भार सहन करावा लागला. रोहितने वयाच्या 14 व्या वर्षी दिग्दर्शक होण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याचा चित्रपटांमधील प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती.

वयाच्या 7व्या वर्षापासून कामाला सुरुवात केली
रोहित शेट्टीने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत प्रवेश केला. अजय देवगणच्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटात तो सहाय्यक दिग्दर्शक होता. त्यानंतर 13 वर्षे अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. एवढेच नाही तर रोहित शेट्टीने तब्बू, काजोल यांसारख्या अनेक हिरोईनसोबत स्पॉटबॉय म्हणूनही काम केले.

2003 मध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण
त्याकाळी दिग्दर्शकाला दिवसाला फक्त 35 रुपये मिळायचे. पण त्यानंतर 2003 मध्ये रोहित शेट्टीने अजय देवगणसोबत दिग्दर्शनात पदार्पण केले. त्याने अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांचा ‘जमीन’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. यानंतर रोहित शेट्टीने अजय देवगणसोबत अनेक हिट चित्रपटांची मालिका केली.

नेट वर्थ 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त 
रोहित शेट्टीला ‘गोलमाल’ आणि ‘सिंघम’मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या दोन्ही चित्रपटांच्या मालिकांमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसला होता. आज रोहित शेट्टीची गणना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांमध्ये केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपल्या प्रत्येक चित्रपटावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या रोहित शेट्टीची (Rohit Shetty Net Worth) एकूण संपत्ती 100 कोटींहून अधिक आहे.