सुरुवात तुमची जरी असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते हे विसरलात का?

मुंबई –  शिवसेना नेते अनिल परब (Shiv Sena leader Anil Parab) यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली गेली आहे.

ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील (Marine Drive) सरकारी निवासस्थानी दाखल झाले होते. ईडीच्या या कारवाईमुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ईडीने अनिल परब यांच्यासंबंधित कोणत्या सात ठिकाणांवर धाड टाकली आहे.

दरम्यान, ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. त्या म्हणाल्या, सत्ता मिळत नाही मग घरगडी कामाला लावला का? तुमचा पहाटेचा टाईम फ्लॅाप होतो हे विसरले का? मिरा भाईंदरच्या फरार आमदाराकडे करोडो सापडले तिथली वाट ED विसरले का? सुरुवात तुमची जरी असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते हे विसरलात का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.