Sunil Tatkare | आता तुम्हाला निवडणुकीत संविधानाची आठवण येतेय का?, सुनिल तटकरेंचा विरोधकांना थेट सवाल

Sunil Tatkare | जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत घटना बदलली जाणार नाही. मात्र आता निवडणूकीत आभास का निर्माण करताय… आता तुम्हाला निवडणुकीत संविधानाची आठवण येते का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला.

सर्वधर्मसमभाव राखला जावा म्हणून काम करण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. अनेक वर्षाचा धार्मिक सलोखा राखण्याचे काम केले आहे. नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री असताना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला निधी वाढवण्याचा प्रस्ताव दिला परंतु त्याकाळच्या मुख्यमंत्र्यांनी तो प्रस्ताव मंजुर केला नाही परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी निधी वाढवून दिला असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

आम्ही धार्मिक सलोखा निर्माण केला आहे त्यामुळे मुस्लिम समाज आपल्या पाठीशी उभा राहणार आहे. ज्यांनी मला निवडणुकीत मदत केली त्यांच्या उपकाराची परतफेड केली आहे. आता घड्याळ चिन्हावर मला निवडून आणलात तर त्याची परतफेड या महाड मतदारसंघातील भरत गोगावले यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून येतील असेही सुनिल तटकरे म्हणाले.

पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करत आलो आहे मात्र कुणी जाणीवपूर्वक बदनाम करत असेल तर मला त्यांचे सत्य सांगावे लागेल असा इशाराही सुनिल तटकरे यांनी दिला.विन्हेरे रेल्वे स्टेशनचा प्रश्न उपस्थित झाला पण हा प्रश्न अनंत गीते यांना मंत्री असूनही सोडवता आला नाही. पण हा प्रश्न माझ्या काळात नक्कीच सोडवला जाईल असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

२०२४ च्या अखेरपर्यंत ४ जी आणि ५ जी चे नेटवर्क गावागावात आल्याशिवाय राहणार नाही असा शब्द देतानाच भरत गोगावले तुम्ही जे काम हाती घेतले आहे त्याला साथ देण्याचे काम खासदार म्हणून करेन असे आश्वासन सुनिल तटकरे यांनी दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा