अनिल परब हे काही अण्णा हजारे नाहीत, हेमंत देसाई याचं रोखठोक मत

मुंबई –  शिवसेना नेते अनिल परब (Shiv Sena leader Anil Parab) यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली गेली आहे.

ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील (Marine Drive) सरकारी निवासस्थानी दाखल झाले होते. ईडीच्या या कारवाईमुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ईडीने अनिल परब यांच्यासंबंधित कोणत्या सात ठिकाणांवर धाड टाकली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई (Senior journalist Hemant Desai) यांनी एक लक्ष्यवेधी पोस्ट केली आहे. ते म्हणाले, अनिल परबांवर ईडीचा छापा पडताच ‘सूडबुद्धीची कारवाई’चा गजर सुरू झाला! त्यासंबंधी काही माहिती आणि पुराव्यांची बाब एका वार्ताहराने काढताच संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ‘या तांत्रिक तपशिलात मला जायचे नाही…’ अरे, कारवाई कोणत्या गोष्टींच्या आधारे झाली आहे, हे तर समजून घ्यावे लागेल ना! जर कारवाई अन्यायकारक असेल, तर भक्कम माहिती देऊन हे आरोप फेटाळून लावा की!समर्थ युक्तिवाद करा. नुसतेच ‘सूडबुद्धी, सूडबुद्धी’ असे ओरडणेदेखील योग्य नाही… शिवाय अनिल परब हे काही अण्णा हजारे (Anna Hazare) नाहीत, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शब्दात ‘पब्लिक आउटक्राय’ वगैरे काही होणार नाही नि झालेला नाही… इतक्या कारवायांनंतर देखील आपल्याबद्दल जनतेत सहानुभूती का निर्माण होत नाही, याचा महाविकासच्या नेत्यांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. असं ते म्हणाले.