Laxman Sivaramakrishnan: “पाकिस्तानमध्ये मला काय सहन करावं लागलं, माझं मलाच माहिती”, माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान!

Laxman Sivaramakrishnan: वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ते पाकिस्तानात गेले आणि त्यांना अत्यंत छळाचा सामना करावा लागला. त्वचेचा रंग, धर्म आणि देश यावरून एका भारतीय क्रिकेटपटूला अनेक व्यंग आणि शिवीगाळ सहन करावी लागली. हे क्रिकेटपटू अजून कोण नसून भारताचा माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन आहेत.

गेल्या शनिवारी झालेल्या भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यादरम्यान ‘जय श्री राम’ घोषणा (jai shri ram) देण्यात आल्या. पाकिस्तानच्या विकेट्स पडत असताना स्टेडियममध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जात असल्याचा दावा पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केला आहे. यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू असताना माजी भारतीय क्रिकेटपटूने दुर्दैवी कथा पुढे आणली.

भारताचे माजी स्टार स्पिनर आणि समालोचक शिवरामकृष्णन यांनी आपल्याला आलेला दुर्दैवी अनुभव सांगताना म्हटले, ‘मी वयाच्या 16 व्या वर्षी जेव्हा पाकिस्तानात गेलो होतो, तेव्हा मला कोणत्या प्रकारचे गैरवर्तन सहन करावे लागले हे फक्त मलाच माहीत आहे. माझ्या त्वचेच्या रंगापासून ते माझा धर्म, माझा देश, माझ्या संस्कृतीपर्यंत माझ्याशी गैरवर्तन झाले. जर तुम्ही ते स्वतः पाहिले नसेल तर कृपया याबद्दल बोलू नका.’

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा