Devendra Fadnavis | …तर शरद पवारांचा स्तर खाली जाईल, सुनील शेळकेंसाठी देवेंद्र फडणवीस ढाल बनले!

Devendra Fadnavis On Sharad Pawar | मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंवर (Sunil Shelke) निशाणा साधला आहे. लोणावळ्याच्या (Lonavala) सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. पवारांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेळके यांचा बचाव केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, पवार साहेब मोठेच आहेत. आज ते इतकी वर्षे राजकारणात आहेत. त्यांना राजकीय क्षेत्रात 55 वर्षे पूर्ण झाली. या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर ते योग्य नाही, असे मला वाटते. मी त्यांना सल्ला देण्याइतका मोठा नाही. पण त्यांनी या गोष्टीचा पुनर्विचार केला पाहिजे. शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत, याचा विचार केला पाहिजे. ते आमदारांना धमक्या द्यायला लागले तर त्यांचा तो स्तर खाली येईल. कोणी आमदार त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देईल, असे वाटत नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे सुनील शेळके यांनी पाठराखण केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं