घोर कलियुग! मंदिरासमोर भीक मागताना दिसली प्रसिद्ध अभिनेत्रीची आई; लेकीचा ओळख दाखवायलाही नकार

Purnima Devi: कलियुगात मुले कमवायला लागली किंवा लग्न होऊन संसारात व्यस्त झाली की आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून देत असल्याच्या बऱ्याचशा घटना आपण पाहिल्या आहेत. अशीच वागणूक एका अभिनेत्रीने आपल्या आईला दिल्याचं समजतंय. सध्या सोशल मीडियावर एक व्हायरल होतोय ज्यात एक वृद्ध महिला मंदिराच्या पायऱ्यांवर भीक मागताना दिसतेय. त्यांचं नाव पूर्णिमा देवी आहे. त्या ९० वर्षांच्या असून एका लोकप्रिय अभिनेत्रीची आई आहे. त्यांचा जावईदेखील लोकप्रिय दिग्दर्शक आहे आणि नात देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. असं असतानाही ती अभिनेत्री आईकडे ढुंकूनही पाहत नाही.

बिहार तक या युट्यूब चॅनेलन त्यांचा व्हिडिओ शेअर केला असून ‘स्कुप वूप’ने याबद्दल माहिती दिली आहे. पूर्णिमा या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मावशीकडे आल्या. त्या तिथे गाणं गायला शिकल्या, पेटी वाजवायला शिकल्या. त्या याच मंदिरात गेली अनेक दशके भजन गात होत्या. त्या रेडिओवरही गायच्या. त्यावरच त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला. त्यांना तिथे मोठा मान होता. आजही तिथले लोक त्यांना मॅडम म्हणून हाक मारतात. पण आता त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यांचा मुलगाही त्यांच्या सोबत गायचा मात्र नंतर त्याला लकवा मारला. तर त्यांची मुलगी अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आली. ती मोठी अभिनेत्री झालीदेखील. तिने ‘सपने सुहाने लडकपन के’ सारख्या अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र त्यानंतर तिने आपल्या आई आणि भावाची विचारपूसही केली नाही.

महत्वाचं म्हणजे काहींनी तिला आईबद्दल सांगण्याचा प्रयत्नही केला. पण तिने थेट आईला ओळखायला नकार दिला. ती अभिनेत्री आता मुंबईत वेगळ्या नावाने ओळखली जाते तर स्वतःला बिहारी ऐवजी गुजराती म्हणवते. सध्या या अभिनेत्रीच्या आईला चालायलाही त्रास होतो. भावाची अवस्थादेखील बिकट आहे. मात्र अभिनेत्री स्वतःच्या जगात रमली आहे. ही बातमी पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

 महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी बुमराह परतला, ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह भारत देणार तगडे आव्हान

राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची घणाघाती टीका! आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीश महाजन