पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी बुमराह परतला, ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह भारत देणार तगडे आव्हान

India Predicted Playing Xi: आशिया चषक 2023 मध्ये (Asia Cup 2023) भारत आणि पाकिस्तानचे (INDvsPAK) संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत. दोन्ही देशांमधला हा महान सामना 10 सप्टेंबर (रविवार) रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता होणार आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाची धुरा बाबर आझमच्या (Babar Azam) खांद्यावर असेल, तर रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. याआधी, दोन शेजारी देश गट सामन्यातही भिडले होते, मात्र तो सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता.

जसप्रीत बुमराह संघात परतणार
या शानदार सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघात सामील झाला आहे. बुमराह कौटुंबिक कारणांमुळे नेपाळविरुद्धच्या सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. बुमराहच्या अनुपस्थितीत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला नेपाळविरुद्धच्या प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले. शमीने नेपाळविरुद्धच्या सामन्यात 7 षटकात 29 धावा देत एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराह संघात परतला असल्याने शमीला प्लेइंग-11 मधून वगळले जाऊ शकते.

दुसरीकडे, यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो संघात सामील झाला आहे. राहुलने 8 सप्टेंबरला (शुक्रवार) विकेटकीपिंगचाही जोमाने सराव केला. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर केएल राहुल प्लेइंग-11 चा भाग असेल तर प्लेइंग-11 मध्ये कोणत्या खेळाडूला वगळले जाईल? कारण डावखुरा फलंदाज इशान किशनने पाकिस्तानविरुद्धच्या गट सामन्यात बॅटने उत्कृष्ट फॉर्म दाखवला होता. परिणामी त्याची जागा जवळपास पक्की झाली.

अशा स्थितीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरवर टांगती तलवार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या गट सामन्यात श्रेयसने बॅटने विशेष काही केले नाही. असे असूनही संघ व्यवस्थापन या फलंदाजाला आणखी एक संधी देऊ इच्छित आहे. श्रेयस अय्यर खेळल्यास केएल राहुलला सामन्यातून बाहेर बसावे लागू शकते.

आशिया चषक गटातील सामन्यांमध्ये, शार्दुल ठाकूरला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले कारण त्याने फलंदाजीमध्ये खोली वाढवली. तसे, शार्दुलची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कामगिरी प्रभावी ठरली नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी शार्दुलच्या जागी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अतिरिक्त फिरकीपटूचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच या सामन्यासाठी बुमराह आणि सिराज हे आघाडीचे वेगवान गोलंदाज असतील आणि हार्दिक पांड्या तिसऱ्या सीमरची भूमिका बजावेल. तर कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल फिरकी विभागाची जबाबदारी सांभाळतील.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचे संभाव्य प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव. , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde