G20 साठी आमंत्रित न करणे ही पाकिस्तानसाठी लाजिरवाणी बाब; पाकिस्तानी नागरिक सरकारवर भडकले 

G20 Summit 2023: नवी दिल्लीत आजपासून सुरू होणाऱ्या G20  शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली आहे. परिषदेसाठी अनेक जागतिक नेते राजधानीत दाखल झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा, अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेझ, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्ताह अल- सिस्ली, ओमानचे राजे हैथम बिन तारिक, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा, रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव्ह आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनिओ गुतेरेस यांचा त्यात समावेश आहे. सगळ्या पाहुण्यांचं विमानतळावर उत्साहात आणि लोकसंगीताच्या साथीत स्वागत करण्यात आलं.या परिषदेत अन्न आणि ऊर्जा सुरक्षेपासून हवामानबदलांपर्यंत अनेक मुद्यांवर या चर्चेत सविस्तर चर्चा होणं अपेक्षित आहे.भारताकडे यंदा G20 चं अध्यक्षपद असून, भारतातली डिजिटल देयक पायाभूत सुविधांमधली क्रांती हे भारताचं वैशिष्ट्य इतर देशांपुढे पोचणार आहे.

विशेष म्हणजे भारताने इतर 9 देशांना पाहुणे म्हणून येण्याचे आमंत्रण पाठवले होते, त्यात बांगलादेशचाही समावेश आहे, जो पाकिस्तानपासून वेगळा होऊन नवीन देश बनला आहे. G20 गटात समाविष्ट देशांव्यतिरिक्त आणखी 9 देशांना विशेष निमंत्रणावर सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या देशांमध्ये बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे.

बांगलादेश आण्विक देश नसतानाही G20 शिखर परिषदेला हजेरी लावणार आहे आणि आण्विक देश असूनही पाकिस्तानला निमंत्रित करण्यात आले नाही, या गोष्टींची पाकिस्तानी लोकांना लाज वाटत आहे.  पाकिस्तानी YouTuber शोएब चौधरी लोकांमध्ये गेला आणि भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेबाबत त्यांचे मत जाणूनघेतलेआहे. यावर पाकिस्तानी नागरिक म्हणाले की, आम्हाला खूप लाज वाटत आहे. भारताने आम्हाला शिखर परिषदेचे निमंत्रण दिलेले नाही.

 महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी बुमराह परतला, ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह भारत देणार तगडे आव्हान

राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची घणाघाती टीका! आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीश महाजन