वर्ल्डकपमध्ये भारतीय मुस्लीम पाकिस्तानला सपोर्ट करतील; माजी पाक क्रिकेटरचे वादग्रस्त वक्तव्य

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज राणा नावेद (Rana Naved) सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी भारताविरोधात केलेली चुकीची विधाने. राणा नावेद यांनी नादिर अली यांच्या पॉडकास्टवर भारतीय मुस्लिमांविरोधात विषारी वक्तव्य केले आहे. नावेद म्हणाले की 2023 साली भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय मुस्लिम पाकिस्तानी संघाला पाठिंबा देतील. नावेद यांचे वक्तव्य येताच अनेक भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानला आरसा दाखवत राणा नावेद यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

नादिर अलीच्या पॉडकास्टवर राणा नावेद म्हणाले, ‘भारतात कोणताही सामना झाला, तर टीम इंडिया नक्कीच सर्वांचा आवडता संघ असेल. मात्र, जेव्हा हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल, तेव्हा भारतातील मुस्लिम भारतीय संघापेक्षा पाकिस्तान संघाला अधिक पाठिंबा देतील. मी अहमदाबाद आणि हैदराबाद येथे दोन मालिका खेळल्या आहेत.’