‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा – लोढा

मुंबई – जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणाऱ्या ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रातील तमाम जनतेला पाहता यावा यासाठी करमुक्त करावा, अशी मागणी भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत महाविकास आघाडी सरकारला केली.

विधानसभेत या विषयावर आपले मत मांडताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. कर्नाटक, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारने ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त केला असून महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा. काश्मीरमध्ये जे घडले आहे ते भारताच्या इतर कोणत्याही भागात घडू नये. यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत व्यक्त केले.