सीजेआय डीवाय चंद्रचूड यांनीही केला चॅट GPT वर कौतुकाचा वर्षाव

CJI DY Chandrachud News: सध्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून यावर आता भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनीही भाष्य केले आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट GPT सारख्या सॉफ्टवेअरने आयुष्य सोपे केले आहे. आज हे सॉफ्टवेअर विनोद बनवण्यापासून ते कोडींग आणि अगदी कायदेशीर विषय लिहिण्यासाठी वापरले जात आहे. आयआयटी मद्रासच्या 60 व्या दीक्षांत समारंभात तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत त्यांनी हे सांगितले.

ते म्हणाले, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हा प्रत्येकाच्या ओठावर असलेला शब्द आहे. याद्वारे संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. यासोबतच चॅट जीपीटी सॉफ्टवेअरचा वापरही वाढला आहे. विनोद बनवण्यापासून ते कोडिंग आणि कायदेशीर विषय लिहिण्यापर्यंत त्याचा वापर होताना दिसत आहे.

CJI म्हणाले की, जेव्हा आपण भविष्याकडे वाटचाल करत आहोत, तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवाच्या विकासात कशी मदत करू शकतात हे आपण पाहिले पाहिजे. यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाचा चुकीच्या कामासाठी वापर करण्याबाबत इशारा देत, त्याचा गैरवापर करून लोकांच्या मनात भीती निर्माण करू नये, अन्यथा लोक उघडपणे आपले मत मांडू शकणार नाहीत, असे सांगितले.

ते म्हणाले की, मानवी मूल्ये आणि गोपनीयता अत्यंत महत्त्वाच्या असल्याने जलद आणि त्वरित संवाद साधण्यासाठी तंत्रज्ञान सोशल मीडिया आणि एआयचा गैरवापर रोखण्यास सक्षम असले पाहिजे. ते म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या विकासासोबत ऑनलाइन धमक्या, गैरवर्तन आणि छळवणुकीच्या घटनाही समोर येत आहेत आणि तंत्रज्ञानाचा वापर हानीकारक कामांसाठी केला जाऊ शकतो हेही स्पष्ट होत आहे.