फुटीर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या तोंडी मोदी शहांच्या स्क्रिप्टचीच भाषा.. ?

फुटीर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या तोंडी मोदी शहांच्या स्क्रिप्टचीच भाषा.. ?

मुंबई – राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर जी भाषा वापरली तशीच भाषा अजित पवार वापरत आहेत, हा काही योगायोग नाही तर दिल्लीतून मोदी-शहांनी दिलेली स्क्रिप्टच आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही लोक गेले असले तरी काँग्रेस सोडून कोणीही जाणार नाही, काही लोक जाणिवपूर्वक अफवा पसरवत आहेत. गद्दारांना सर्वजण गद्दारच दिसत असतात मात्र काँग्रेसमध्ये कोणी गद्दार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Pradesh Congress Committee President Nana Patole) यांनी स्पष्ट केले आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्तेच्या जोरावर भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष फोडत आहे. भाजपाला विरोधी पक्षच नको आहेत म्हणून विरोधी पक्षात फुट पाडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपाचे हे फोडाफोडीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला आवडलेले नाही म्हणूनच फुटीर नेत्यांच्या मतदारसंघात त्यांना पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना नेहमीच महत्वाची पदे दिली, संघटनेत महत्वाची जबाबदारी दिली, दहा वर्षे केंद्रीय मंत्रिपद दिले, लोकसभेला पराभव झाल्यानंतर राज्यसभेवर पाठवले तेच पटेल आज शरद पवार यांच्यावर आरोप करत खालच्या पातळीची भाषा वापरत आहेत.

अधिवेशनात शेतकरी, बेरोजगारी, महागाईचे मुद्दे..
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकरी संकटात आहे, सरकारने मदत जाहीर केली पण ती मिळालेली नाही. सोयाबीन, कांदा, केळी पिकाला भाव नाही तर कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडूनच आहे. जून महिना संपला तरी अजून पेरण्या झालेल्या नाहीत. या प्रश्नांवर पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. १७ तारखेपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात पहिल्या दिवशीच महागाई, बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारू असे पटोले म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=c8mUqXwFXek

Previous Post
किशोर आवारे प्रकरणातील मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बेड्या

किशोर आवारे प्रकरणातील मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बेड्या

Next Post
आता जीएसटीमध्ये घोळ करणाऱ्यांवर ईडी कारवाई करणार

आता जीएसटीमध्ये घोळ करणाऱ्यांवर ईडी कारवाई करणार

Related Posts
उद्धव ठाकरे

उद्धवजी… तुम्ही वर्षा सोडलं, तुम्ही मंत्रालयात जात नाही  मग राज्य कोण चालवतंय ?

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात…
Read More
arun lad

शासकीय भरती तात्काळ सुरु करा; आमदार अरुण लाड यांची विधान परिषदेत मागणी

Mumbai – राज्य शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा व पदोन्नतीच्या एकून दोन लाख १९३ जागा रिक्त असून त्यात…
Read More
Atul Londhe | काँग्रेसच्या आंदोलनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार न्याय

Atul Londhe | काँग्रेसच्या आंदोलनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार न्याय

Atul Londhe :  रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील गैरकारभाराने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता.…
Read More