पुण्याच्या सचिन खिलारेला आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदक

Sachin Khilare : आझम कॅम्पसमध्ये सराव करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडू सचिन खिलारे यांने सध्या चीन येथील हंगझाऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा स्पर्धेतील ‘गोळाफेक’ या प्रकारात १६.०३ मीटरची गोळाफेक करताना सुवर्ण पदक पटकावले. या सुवर्ण फेकीने नवीन स्पर्धा विक्रमाची नोंद देखील करण्यात आली आहे.(Sachin Khilare won gold medal in Asian Para Championship).

यापूर्वी पॅरिस येथे झालेल्या पॅराऍथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत देखील सचिन खिलारेने सुवर्णपदक पटकावले होते. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत देखील सचिनने सुवर्णपदक पटकावले होते. सचिन गेल्या चार वर्षांपासून आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर सराव करत आहे.

सचिन खिलारीने मिळविलेल्या दिमाखदार यशासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामादार, सचिव इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लीम मुलांना महाविद्यालयात जायला वेळ नसतो मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो’

ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या – Ramdas Kadam

मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत