कुणाच्याही ताटातलं न काढता मराठ्यांना आरक्षण द्या; शरद पवारांची आक्रमक मागणी

Sharad Pawar On Maratha Reservation :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लातुर जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी पक्षप्रवेश प्रवेश केला.  या पक्ष प्रवेशाच्या वेळी त्यांनी आपल्या भाषणातून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले.

आज देशाच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न या आरक्षणाच्या प्रश्न आधी देखील चर्चा झालेली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मी स्वतः जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं काय आहे हे समजून घेतलं आणि त्यातून मार्ग काय काढता येईल याचाही विचार केला. केंद्र आणि राज्य सरकारने आरक्षणाच्या विषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता होती परंतु ती लांबणीवर गेली आहे. आणि त्याचा परिणाम आपण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वनव्याच्या स्वरूपात पाहत आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आग्रही भूमिका घेत आहे. आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे देखील मराठा आरक्षण प्रश्नासाठी राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत .

जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या जरांगेंच्या उपोषणाची दखल घेत जरांगेंच्या मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे असं शरद पवार म्हणाले तसेच केंद्र आणि राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा असं देखील शरद पवार म्हणाले. कुणाच्याही ताटातलं न काढता मराठ्यांना आरक्षण द्या असे शरद पवार  म्हणाले आहेत.मी अपेक्षा करतो की आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा जरांगे पाटलांची प्रकृती व्यवस्थित राहावी आणि महाराष्ट्रातली ही परिस्थिती लवकरात लवकर नीट व्हावी असेही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लीम मुलांना महाविद्यालयात जायला वेळ नसतो मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो’

ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या – Ramdas Kadam

मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत