श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या 19 भारतीय मच्छिमारांची सुटका करा; एमके स्टॅलिन यांची केंद्र सरकारला विनंती

नवी दिल्ली –  श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या 19 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin)  यांनी केंद्र सरकारला केले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात स्टॅलिन त्यांनी मच्छिमारांच्या दुर्दशेवर चिंता व्यक्त केली आणि गेल्या 30 दिवसांत 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 34 मच्छिमारांना अटक करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले.

अटकेचे सत्र सुरूच राहिल्याने राज्यातील मच्छिमारांच्या जीवनमानावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितलं. श्रीलंकन नौदलाने काल सकाळी तामिळनाडूतील 10 मच्छिमारांना अटक केली. कोडियाकराईजवळ 41 सागरी मैलांवर मासेमारी करत असताना त्यांना पकडण्यात आले. त्यांच्या बोटीही जप्त करून त्रिंकोमाली येथे नेण्यात आल्या.