जयंत पाटील कुठल्याही पक्षात जाणार नाही हे किती वेळा सांगायचे – जितेंद्र आव्हाड

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब हेच आहे. आमच्या पक्षांमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही आहे. हा पक्ष आमचाच आहे. आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले तुम्ही या पत्राची दखल घ्यायला नको हवी होती कारण अस काही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे असे आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटले असल्याचे माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तसेच नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी प्रसार माध्यमांची बोलताना म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. मात्र यावर अजित पवार गट पक्ष आमचा असल्याचा दावा करू शकत नाही. 5 तारखेला निवडणूक आयोगाला पत्र पाठवले असून 30 तारखेला निवड झाली असल्याचे म्हटले आहे. मात्र शरद पवार हेच विठ्ठल हे भाष्य केले आहे. नंतर अध्यक्ष बदलला असे विरोधाभास भूमिका घेऊ शकत नाही. निवडणूक आयोगाला हे लक्षात घ्यावं लागेल. याचिका पाच जुलै रोजी दाखल झाली आहे. या माध्यमातून त्यामधील संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न आहे त्यात ते यशस्वी होतील असे त्यांना वाटत आहे असे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तसेच नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

जितेंद्र आव्हाड यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाने आम्हाला यावर उत्तर देण्याकरिता सांगितले होते त्यानुसार उत्तर देण्यात आले आहे. आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले तुम्ही या पत्राची दखल घ्यायला नको हवी होती कारण अस काही नाही. प्रफुल पटेल यांनी शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते. मंग अजितदादा गटाची बैठक कधी घेतली त्या संदर्भातील काय पुरावे आहे का? असेल तर ते सर्व पुरावे कागदपत्र आम्ही आयोगाकडे मागितले आहे. निवडणूक आयोग कडे रजिस्टर पक्ष राष्ट्रवादी आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात देखील म्हटले आहे की पक्ष ही नाळ आहे. पक्षातील काही आमदार जोडून काही जण एकत्र येतात आणि नाळ तोडतात त्यांचे म्हणणे असे केलं आणि पक्ष आपला म्हणणे हे योग्य नाही हे कोर्टाने स्पष्ट म्हंटले आहे. असेही देखील आव्हाड यांनी सांगितले आहे.

जयंत पाटील (jayant patil) यांच्या संदर्भात पक्ष बदलीच्या चर्चेवर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की जयंत पाटील कुठल्याही पक्षात जाणार नाही हे किती वेळा सांगायचे. शरद पवार साहेबांसोबत आम्ही सर्व आमदारांनी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याचे बातम्या चुकीच्या आहेत जयंत पाटील यांच्या संदर्भात संशयाचे वातावरण मुद्दाम तयार करण्यात येत आहे. आमच्या ठाण्यात फोन येतात जयंत पाटील आमच्याकडे येतात तुम्ही कशाला राहतात साहेब आणि आव्हाड एकटे राहणार तुम्ही या असे ठाण्यात कार्यकर्त्यांना फोन येत आहे असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब 17 ऑगस्ट पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. बीड जिल्ह्यात कार्यकर्त्यांची बैठक आणि शरद पवार साहेबांचे सभा होणार आहे. या सभेसाठी मैदान देखील बुक झाले असून तयारी पूर्ण झाली आहे. या सभेचे नियोजन बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप क्षीरसागर हे करत आहे. असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली यावर जितेंद्र आव्हाड यांना विचारलेल्यावर बोलताना म्हटले की ही चांगली गोष्ट की राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळाली आहे. लोकसभेत सर्वसामान्यांचा आवाज ते पुन्हा मांडणार आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी पराभव झालं दिग्गज हरले नंतर लढाईत त्यांचा छळ झाला सुविधा नाकारल्या त्या लढत राहिल्या त्यानंतर मोठ्या प्रमाणात विजयी झाल्या त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून सातत्याने होत असलेल्या टीका आणि सत्तेच्या माध्यमातून त्यांना देण्यात येत असलेला त्रास तरी देखील राहुल गांधी हे भाजप विरोधात लढत राहिले. त्यामुळेच त्यांचा विजय झाला आहे.

कोरोना असताना बाहेर पडले तर काय झालं हे उदाहरण मी आहे. मला कोरोना झाला नशीब मी जिवंत आहे. उद्धव ठाकरे शारीरिक प्रकृती ठीक नव्हती. त्यावर बोलणार घरकोंबडा त्या माणसाने जशी परिस्थिती सांभाळली जगभरात कौतुक झाले. मी मरणाच्या दारातून वाचलो तर ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी फोन करून मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवले म्हणून मी वाचलो लॉकडाऊन विरोधात अनेक जण बोलले पण ते म्हणाले मला एक ही मराठी माणसाचा मृत्यू झाला नाही पाहिजे ही त्यांच्या त्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे विरोधकांकडून होत असलेल्या टीका काही गांभीर्याने घेण्यासारख्या नाही आहे असेही देखील जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.