पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतून परत येताच सर्वात आधी करणार ‘हे’ काम 

Chandrayaan 3 Landing – भारताने अ अंतराळात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेलं हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वतःचा झेंडा फडकवणारा भारत हा जगातला पहिलाच देश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दक्षिण आफ्रिकेतून परत येताच 26 ऑगस्ट रोजी बंगळुरूमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटणार आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२३ ऑगस्ट २०२३) पंतप्रधान मोदींनी इस्रो प्रमुखांना वचन दिले होते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने बुधवारी (23 ऑगस्ट 2023) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला. यानंतर पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इस्रोच्या वैज्ञानिकांसह सर्व देशवासीयांना कुटुंबीय म्हणून संबोधित केले.