गंगाखेड : पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा

गंगाखेड / विनायक आंधळे – गंगाखेड (Gangakhed) तालुक्यात 15 दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे व गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage to crops and agriculture) झाले असून सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली आहेत. कापूस ,सोयाबीन, तुर, मूग, उडीद अशा सर्व पिकांचे ९०% नुकसान झाले आहे. पिकांचे तात्काळ पंचनामे (Panchnama) करून ओला दुष्काळ (wet drought) जाहीर करा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय (ABVP) कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्वरी तिडके (Siddeshwari Tidke) यांनी केली आहे.

तालुक्यातील राणीसावरगाव, महातपुरी, कोद्री, मरडसगाव, इसाद, (Ranisawargaon, Mahatpuri, Kodri, Mardasgaon, Isad) व इतर सर्वच मंडळामध्ये नुकसानीत आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे सरसकट पंचनामे करून गंगाखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना या संकटातून दूर करण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी सिद्धेश्वर तिडके यांनी तहसीलदार श्री स्वरूप कंकाळ (Tehsildar Shri Swaroop Kankal) यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी महादेव चाटे, श्याम कातकडे (Mahadev Chate, Shyam Katkade) आदी शेतकरी उपस्थित होते.